online shopping : ऑनलाइन शॉपिंग करताना या गोष्टींची घ्या काळजी

सध्या अॅमेझोन व फ्लीपकार्ट वर नवरात्रनिमित्त चालू असलेल्या सेल बद्दलची चर्चा सुरु आहे. अशा काळात ऑनलाइन फ्रॉड आणि स्कॅम झाल्याची प्रकरणे समोर येतात. आपण या फसवणूकीपासून सावध कसे राहावे त्यासाठी ‘या’ गोष्टींची काळजी घ्यावी.

आजकाल सोशल मीडियावर अनेक शॉपिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. जे ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देतात. अशावेळी सायबर फसवणूक टाळण्यासाठी विश्वसनीय वेबसाइटवरून खरेदी करा. अनोळखी वेबसाइटवरून खरेदी केल्याने तुमचे खाते हॅक होण्याची भीती आहे. यामुळे तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी होऊ शकता.

कोणत्याही वेबसाइला भेट देण्याआधी प्रथम URL तपासा. नेहमी “https” पासून सुरू होणारे वेबसाइटवर क्लिक करा. वेबसाइट डोमेन नाव जसे .in .com वर लक्ष देणे आवश्यक आहे. सोशल मीडिया या तिसऱ्या व्यक्तीकडून आलेल्या कंपनीच्या वेबसाइटवर क्लिक करण्यासाठी आधी लक्ष देणे आवश्यक आहे, एक फेक वेबसाइट आणि URL असू शकते, जो तुमची पर्सनल माहिती चोरी करेल.

जर तुम्ही ऑनलाइन खरेदी करत आहात, आणि पेमेंटसाठी ईएमआय ऑप्शन निवडत आहात, तर तुम्हाला काही खास गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. नाहितर, तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. ईएमआयवर व्याज देण्याचा पर्याय असतो. अशाकाळात नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडावा.