ट्रॅफिकमध्ये अडकली रेल्वे; व्हिडीओ होतोय व्हायरल

मुंबईनंतर बेंगळुरुच्या ट्रॅफिकची ख्याती जगभरात प्रसिद्ध आहे. जर तुम्ही एकदा या ट्रॅफिकमध्ये अडकलात तर त्यातून बाहेर पडणे तुमच्यासाठी कठीण आहे. अलीकडेच बेंगळुरूने सर्वाधिक रहदारी असलेल्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. या ट्रॅफिकमधून आता रेल्वे देखील सुटू शकलेली नाही. या घटनेचा सध्या एक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ रेल्वे फाटकाजवळचा आहे. तेथे वाहतूक कोंडी झाल्याचे स्पष्ट दिसत आहेत. जेव्हा एखादी रेल्वे फाटक ओलांडत असते तेव्हा फाटकावर लाल सिग्नल दिला जातो आणि फाटक बंद केले जाते. जेणेकरून वाहतूक थांबते आणि रेल्वे तिथून पुढे जाते. मात्र यावेळी रेल्वेनेही बेंगळुरूच्या ट्रॅफिकपुढे शरणागती पत्करली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. रेल्वे फाटकावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे रेल्वेला थांबून राहावे लागले. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आता याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने केलेले वक्तव्य समोर आले आहे. एका वृत्तपत्राशी बोलताना दक्षिण पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, रेल्वे ट्रॅफिकमध्ये अडकली नव्हती. मात्र रेल्वे काही तांत्रिक समस्येमुळे मुन्नेकोल्लाला गेटजवळ थांबवण्यात आली होती. रेल्वे धावत असताना लोको पायलटला रेल्वेट्रेनमधून एक विशिष्ट आवाज आला. तेव्हा त्याला काहीतरी गडबड झाल्याचे जाणवले, त्यानंतर तांत्रिक मदत येईपर्यंत रेल्वे तिथेच थांबवण्यात आली. वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी फाटक उघडून वाहतूक रिकामी करण्यात आली. असे यावेळी रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.