मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात शनिवारी रात्री बस आणि डंपर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ही बस प्रयागराजहून नागपूरकडे जात होती. यावेळी सुमारे 11 च्या सुमारास जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 25 किमी अंतरावर असलेल्या नादान देहाट पोलीस ठाण्याजवळ बस दगडांनी भरलेल्या डंपरला धडकली. बसचा आणि डंपरचा वेग जास्त असल्यामुळे दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे.
VIDEO | Madhya Pradesh: Rescue operation underway as dozens were injured after a bus collided with a parked truck in Maihar. More details awaited.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/ugSX5z3q7d
— Press Trust of India (@PTI_News) September 28, 2024
अपघाताची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. तर या 20 जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मैहरचे पोलिस अधीक्षक सुधीर अग्रवाल यांनी दिली. या जखमींवर मैहर आणि अमरपाटण येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.