अंगणवाडी सेविकांचा 1 ऑक्टोबरला चक्का जाम
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक निवृत्ती वेतन आदी मागण्यांसाठी 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात स्वतःला अटक करून घेत अंगणवाडी सेविकांनी जेल भरो आंदोलन केले. त्यानंतरही राज्य सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने येत्या 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ आणि ‘मास्टर ऑफ सर्जरी’ हे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेश अर्ज नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 2 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी अर्ज भरता येणार आहे. राज्यातील शासकीय, महानगरपालिका, खासगी वैद्यकीय महाविद्यालयात राज्य कोट्यांतर्गत विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत.