ऑक्टोबर महिन्यात सुट्ट्याच सुट्ट्या आल्या आहेत. नवरात्रीपासून दसरा आणि दिवाळीपर्यंत सुट्ट्या मिळणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात शनिवार आणि रविवारसह अनेक सणांच्या सुट्टीचा समावेश आहे. जम्मू-कश्मीरमधील निवडणूक, गांधी जयंती, दुर्गा पूजा, दसरा, लक्ष्मी पूजन, दिवाळीच्या दिवशी बँका बंद राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात देशातील वेगवेगळ्या सणांनिमित्त बँकांना सुट्टी मिळणार आहे. परंतु यूपीआय, नेटबँकिंग, मोबाईल बँकिंगचा वापर सुरू राहणार आहे. कॅश विड्रॉवल करण्यासाठी एटीएमचा वापरसुद्धा करता येणार आहे.