जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक, गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पाच जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात जवान आणि दहशताद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर एका अधिकाऱ्यासह सुरक्षा दलाचे पाच जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील देवसर भागातील आदिगाम गावात शनिवारी पहाटे सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोधमोहीम सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (वाहतूक) मुमताज अली चकमकीत किरकोळ जखमी झाले. परिसरात अद्याप शोध मोहिम सुरू आहे. मारले गेलेल्या दहशताद्यांची आणि त्यांच्या संघटनेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.