Latur News – हडोळतीमध्ये वीज अभियंत्याला मारहाण करत ठार मारण्याची धमकी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लातूर जिल्ह्यात अहमदपुर तालुक्यातील मौजे हडोळती येथील महावितरणच्या शाखा कार्यालयात कनिष्ठ अभियंत्याला शिवीगाळ करण्यात आली. तसेच मारहाण करत ठार मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाणीसह विविध कलमान्ये अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जाधव (रा. हिप्पळगांव) असे या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

कनिष्ठ अभियंता अमोल प्रकाश सुर्यवंशी आणि महिला कर्मचारी प्रियंका सुधाकर हडोळतीकर हे कर्मचारी दि. 27 रोजी शुक्रवारी ऑफीसमध्ये दैनंदिन कामकाज करीत होते. त्यावेळी दुपारी 12.30 वाजता कृष्णा जाधव हा ऑफीसमध्ये आला. तो म्हणाला की, माझ्या शेतातील विद्युत पोल झुकला आहे. त्याचे काम कधी करणार असे त्याने अभियंता सुर्यवंशी यांना विचारले. सुर्यवंशी यांनी दुपारपर्यंत तुमचे काम होऊन जाईल, असे सांगीतले. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने ऑफीसमधील साहित्य अस्ताव्यस्त करत फकण्यास सुरुवात केली. तसेत कामात अडथळा आणला. आॉफीसमधील साहित्याची मोडतोड केली. त्यानंतर अभियत्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या शेतातील काम झाले नाही तर ठार मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कनिष्ठ अभियंतांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कृष्णा जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.