अदानी हा मोदी, शहांचा लाडका उद्योगपती, त्याचे कंत्राट रद्द करण्याचा फडणवीसांना अधिकार आहे का? संजय राऊत यांचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेच्या झालेल्या दणदणीत पराभवाबाबत प्रतिक्रिया दिली. तसेच अदानी हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा लाडका उद्योगपती, बिल्डर आहे. तेच अदानी यांना कंत्रांटे देतात. अदानी यांचे कंत्राट रद्दकरण्याचा फडणवीस यांना अधिकार आहे काय, असा सवाल करत संजय राऊत यांनी फडणवीस यांना जबरदस्त टोला लगावला आहे.

अदानी यांनी आमचे म्हणणे ऐकले नाही तर त्यांचे कंत्राट रद्द करू असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अदानीचे कंत्राट रद्द करण्याचे अधिकार फडणवीस यांना आहेत का, अदानी यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा कंत्राटे देतात. अदानी हे मोदी, शहा यांचे लाडके उद्योगपती आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या वक्तव्याला काहीही अर्थ नाही.

धारावी विधानसभेची जागा शिवसेनेने लढवावी, अशी मागणी होत आहे. धारावी कृती समितीचे नेते यासाठी भेटी घेत आहेत. धारावी बचाव आंदोलनाला शिवसेनेने बळ दिले आहे. त्यांची भूमिका आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडणार आहोत. तसेच काँग्रेस नेत्यांशीही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीत कोणताही पक्ष स्वतःचा आकडा घेऊन बसलेले नाहीत. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयमी भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीची वज्रमूठ बळकट आहे. त्यामुळे भाजपला आम्ही लोकसभा निवडणुकीत दणका दिला आहे. अशा परिस्थितीत प्रकाश आंबोडकर यांनी आमच्यासोबत यावे, ते आमच्यासोबत आले असते तर भाजपला राज्यातून हद्दपार केले असते. संविधानाला अजूनही धोका आहे. त्यामुळे प्रकाश आंबोडकर यांनी आमच्यासोबत यावे, असेही संजय राऊत म्हणाले.