>> अस्मिता प्रदीप येंडे
ज्या वयात मुले मजामस्ती करणे, फिरणे अशा गोष्टी करतात, त्या वयात संगीताची साधना करणारी युवा गायिका मैथिली ठाकूर ही खास करून शास्त्राrय संगीत आणि भक्ती संगीतासाठी ओळखली जाते. मैथिलीने जे यश मिळवले आहे, त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तिला कसा प्रवास करावा लागला असेल, याची माहिती इतरांना मिळावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने लेखक सुनील पांडे यांनी ‘लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर’ हे पुस्तक लिहिले आहे. अवघ्या 50 पानांच्या या पुस्तकात ‘मैथिली ते युवा गायिका मैथिली ठाकूर’ हा संगीतमय प्रवास अत्यंत नेमकेपणाने मांडलेला आहे. लेखकाने कुठेही वाहवत न जाता वाचकांची वाचन क्षमता लक्षात घेऊन अगदी मुद्देसूद मांडणी केलेली आहे. पुस्तकातील तृतीय पुरुषी निवेदनशैली तरल आहे. साधीसोपी आहे. पुस्तकात मैथिलीच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण क्षणचित्रेही समाविष्ट केली आहेत. मैथिली ठाकूर हिचा जन्म बिहारमधील मधुबनी जिह्यातील बेनीपट्टी गावात झाला. घरात असलेले धार्मिक वातावरण तसेच वडिलांकडून मिळालेले संगीताचे धडे यामुळे मैथिलीच्या मनात संगीताची बीजे रुजली गेली.
बऱयाचदा आपण लहानपणी जे स्वप्न पाहतो, मी मोठेपणी अमुक होणार, त्यात वयानुरूप बदल होत राहतात, पण मैथिलीसाठी गाणे हे प्राणवायूच आहे हे पुस्तक वाचताना जाणवते. एखाद्याचे यश आपल्याला सहज दिसते, पण आपण त्यामागील त्याचे कष्ट, जिद्द, आलेल्या अडचणी नजरेआड करतो, नाही का? आपल्याला कशात रुची आहे, आपले स्वप्न काय आहेत, यावर विचार करून आपले ध्येय ठरवा आणि मग पुढील वाटचाल करा, यश हमखास मिळते. हेच या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकाला सांगायचे आहे.
लेखकाने विविध माध्यमांतून पुस्तकातील संदर्भ घेऊन, त्याची सत्यता पडताळून ही माहिती दिलेली आहे. पुस्तकाच्या शेवटी मैथिली ठाकूर हिचा संपूर्ण परिचयही दिलेला आहे.
लोकप्रिय युवा गायिका मैथिली ठाकूर
लेखक : सुनील पांडे n hedरकाशक : बुकगंगा पब्लिकेशन्स
मूल्य ः 175 रुपये