चौघांकडे जगातील सर्वात जास्त संपत्ती

जगभरात 200 अब्ज डॉलरपेक्षा अधिक संपत्ती असलेले चार अब्जाधीश आहेत. चौघांची एकूण संपत्ती एपूण 885 अब्ज डॉलर एवढी आहे. एलन मस्क, जेफ बेजोस, मार्क झुकेरबर्ग, बर्नार्ड अर्नाल्ट अशी चौघांची नावे आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या नव्या यादीनुसार, एलन मस्क जगातले एक नंबरचे श्रीमंत आहेत. 200 अब्ज डॉलरच्या क्लबमधील सदस्यांची संख्या आता चार झाली आहे. उद्योगपती बर्नार्ड अर्नाल्ट यांची पुन्हा या क्लबमध्ये एंट्री झाली आहे. एलन मस्क (263 अब्ज डॉलर), जेफ बेजोस (214 अब्ज डॉलर), मार्प झुकेरबर्ग (202 अब्ज डॉलर), बर्नार्ड अर्नाल्ट (201 अब्ज डॉलर) यांचा 200 अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सहभाग आहे.

हिंदुस्थानी अब्जाधीशांची संपत्ती (अब्ज डॉलरमध्ये)

मुकेश अंबानी – 114
गौतम अदानी- 105
शपूर मिस्त्री- 41.9
शिव नाडर- 41.3
सावित्री जिंदाल- 36.5
दिलीप सांघवी- 31.1
अजीम प्रेमजी- 30
सुनील मित्तल- 27.7
राधाकिशन दमानी- 24.4
कुमार बिर्ला- 23