KBC च्या पहिल्या करोडपती स्पर्धकाच्या खात्यात जमा होणार का 1 कोटी रुपये?

KBC सीजन 16 ला आपला पहिला करोडपती मिळाला आहे. चंद्र प्रकाश असे या विजेत्याचे नाव आहे. चंद्र प्रकाशने 1 कोटी च्या प्रश्नाच अचूक उत्तर देऊन करोडपती चा ताज मिळवला आहे. पण प्रश्न असा आहे कि चंद्र प्रकाशच्या खात्यात 1कोटीची रक्कम जमा होणार का? असा प्रश्न उभा राहिला आहे.

अमिताभ बच्चन च्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये सीजन 16 चा स्पर्धक चंद्र प्रकाश हा पहिला करोडपती ठरला. चंद्र प्रकाश हा जम्मू काश्मीर चा राहणारा आहे. चंद्रप्रकाश 7 कोटींच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही.आणि त्यांना एक कोटी घेऊन घरी जावे लागले,असले तरी चंद्रप्रकाश यांच्या खात्यात किती पैसे येणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना एक कोटीची संपूर्ण रक्कम मिळणार की त्यातून किती कर वजा होणार?

कौन बनेगा करोडपतीमधील सर्व प्रश्नांची उत्तरे देताना, जर एखाद्या व्यक्तीने एक कोटी रुपये जिंकले तर संपूर्ण रक्कम त्याच्या खात्यात येत नाही. त्याऐवजी, सर्व प्रथम त्याच्या जिंकलेल्या रकमेतून TDS कापला जातो. भारतीय कर नियमांनुसार, स्पर्धकाला कलम 194B अंतर्गत विजेत्या रकमेवर 30 टक्के TDS भरावा लागतो. म्हणजेच स्पर्धकाकडून 30 लाख रुपये टीडीएस म्हणून कापले जातात. याशिवाय, स्पर्धकाला या रकमेतून अधिभार देखील भरावा लागतो, जो TDS रकमेच्या 10 टक्के आहे, म्हणजेच स्पर्धकाच्या विजेत्या रकमेतून 3 लाख रुपये आणखी कमी केले जातात. एकूणच, 1 कोटी रुपयांपैकी, स्पर्धकाला 33 लाख रुपये जिंकलेल्या रकमेतून वजा होतात. आणि जर कोणी 50 लाखांपेक्षा कमी रक्कम जिंकली असेल अशा स्पर्धकाकडून अधिभार रक्कम घेतली जात नाहि.

तेव्हा, हे सर्व पैसे कापल्यानंतर KBC 16 मध्ये 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या चंद्र प्रकाशच्या खात्यात फक्त 65 लाख 68 हजार रुपये येतील.