आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेत रेहानला विजेतेपद

माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब (एमजेएससी) व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आंतरशालेय-कॉलेज कॅरम स्पर्धेमध्ये वरळी सीफेस म्युनिसिपल शाळेचा रेहान शेख विजेता ठरला. अचूक खेळासह गेममधील सर्व बोर्डात राणीवर वर्चस्व राखत रेहान शेखने अंतिम फेरीत पोद्दार अकॅडमी हायस्कूल-मालाडच्या प्रसन्न गोळेचे आव्हान 25-0 असे संपुष्टात आणले आणि अजिंक्यपदाच्या माहीम ज्युवेनाईल चषकाला गवसणी घातली. विजेत्या-उपविजेत्यांना एमजेएससीचे अध्यक्ष विजय येवलेकर, राजन गुप्ता, विकास खानोलकर, महेश शेट्ये, लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.