मुंबई, पुणे आणि ठाण्यात बुधवारी पावसाने दाणदाण उडली. मुंबईत पावसामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली. तर रस्त्यांवर पाणी तुंबल्याने वाहतूक कोंडी झाली. पण यावर राज्यातील महायुती सरकारमधून एकाही मंत्र्याने किंवा नेत्याने अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधारी भाजप-मिंधेंवर हल्लाबोल केला.