
उत्तर प्रदेशातील एका भाजप नेत्याची पत्नी भाडेकरू असलेल्या एका तरुणासोबत पळून गेल्याची घटना उत्तर प्रदेशातील गोपीगंड येथे घडली. हा भाडेकरू पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत असून तो काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. या महिलेचे वय 45 असून प्रियकराचे वय 30 वर्षे आहे. हे दोघे पळून गेल्यानंतर महिलेच्या पतीने पोलीस स्टेशन गाठून या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे. हवालदार असलेल्या तरुणाने माझ्या पत्नीला फूस लावून पळवून नेले आहे. पत्नीने घरातील अडीच कोटी रुपयांचे दागिने, रोख रक्कम आणि 7 वर्षांच्या छोट्या मुलाला घेऊन फरार झाल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. या भाजप नेत्याने आणि पळून गेलेल्या महिलेने निवडणूक लढवली होती. भाजप नेत्याचा परिसरात चांगलाच दबदबा आहे.