मुख्यमंत्री व्हायचंय, पण गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकते, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

मुख्यमंत्री व्हायचंय पण संधी मिळत नाही अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्रिपदावरच गाडी अडकते असेही अजित पवार म्हणाले.

इंडिया टुडेच्या कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की मलाही वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं, पण संधी मिळत नाही, माझी गाडी उपमुख्यमंत्रिपदावरच अडकली आहे. मी पूर्ण प्रयत्न करतोय की गाडी पुढे जावी पण संधी मिळत नाही. 2004 साली राष्ट्रवादीला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती, पण पक्ष नेतृत्वाने ती संधी गमावली. जो कुणी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतो त्याला ती सीट आवडते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची एकच सीट आहे. पण ज्याकडे 145 जागांची आकडेवारी आहे तो मुख्यमंत्री होऊ शकतो. महायुतीच्या माध्यमातून आम्हाल पुन्हा सत्तेत यायचे आहे असेही अजित पवार म्हणाले.