>> योगेश जोशी
गणेशोत्सवाची धूमधाम संपून आता संपली असून पितृपक्ष सुरू आहे. या काळात पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, तर्पण आदि केले जातात. त्यानंतर अश्विन महिना महिना सुरू झाल्यावर नवरात्रीची धामधून सुरू होते. आता नवरात्र म्हणजे गरबा आणि दांडिया असे समीकरण झाले आहे. तसेच नऊ दिवस विविध रंगाचे कपडेही घालण्यात येतात. मात्र, फक्त नवरात्र यासाठीच सीमित नाही. नवरात्र म्हणजे आदिशक्तीची उपासना करण्याचे पर्व आहे.
आपल्या कालगणनेप्रमाणे वर्षभरात चार नवरात्री असतात. त्यातील शारदीय नवरात्र आणि चैत्री नवरात्र यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन शुद्ध प्रतिप्रदेपासून होते. नऊ दिवस आदिशक्तीची उपासना केल्यावर दहाव्या दिवशी दसरा साजरा करण्यात येतो. याच दिवशी देवीने महिषासुराच वध केला होता. तसेच याच दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळे सत्यावर सत्याचा आणि अशुभावर शुभाचा विजयाचे प्रतीक म्हणून दसरा साजरा केला जातो.
यंदा 2 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असून 3 ऑक्टोबरपासून नवरात्रीची सुरुवात होत आहे. नवरात्रीत आदिशक्तीच्या नऊ रुपांचे पूजन आणि अर्चन करण्यात येते. त्यामुळे आदिशक्तीला नवदुर्गा असेही म्हटले जाते. देशभरात हा उत्सव उत्साहात आणि विविध पद्धतीने साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात ठिकठिकाणी दुर्गादेवीच्या मुर्ती स्थापन करण्यात येतात. तर कही ठिकाणी घटांची स्थापना करून पुजन करण्यात येते. तसेच पहिल्या दिवशी कलशाची स्थापनाही करण्यात येते.
यंदा नवरात्रीत घटस्थापना आणि कलशस्थापना करण्यासाठी सकाळी 6.15 ते 7.22 आणि दुपारी 11.46 ते 12.33 मिनिटे असा शुभ काळ आहे. या वेळेत शक्य नसल्यास सूर्यास्तापर्यंत घटस्थापना करता येऊ शकते. अनेकजण नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठ करतात. तर काहीजण नऊ दिवस उपवास करतात. या काळात दुर्गादेवीची उपासना शीघ्र फलदायी मानली जाते.
नवरात्रीत उपासना करण्यात येणाऱ्या आदिशक्तीची नऊरुपे
शैलपुत्री – प्रतिपदा तिथि
ब्रह्मचारिणी द्वितीया तिथि
चंद्रघंटा तृतीया तिथि
कुष्मांडा चतुर्थी तिथि
स्कंदमाता पंचमी तिथि
कात्यायनी षष्ठी तिथि
कालरात्रि सप्तमी तिथि
महागौरी दुर्गा अष्टमी
नवदुर्गा नवरात्र व्रताचे पारणे
दुर्गामुर्तीचे विसर्जन दशमी तिथि (दसरा)