यंदा समाधानकारक मॉन्सून झाला आहे. तसेच आता मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. या परतीच्या पावसाचा जोर आता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुणे शहरात सोमवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
शहरातील अनेक भागात रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप आल्याचे दिसून आले.
जोरदार पावसामुळे शहरातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. (छायाचित्र – चंद्रकांत पालकर)