बदलापूरमधील शाळेचे ट्रस्टी कोठे आहेत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? आदित्य ठाकरे यांचे संतप्त सवाल

बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींच्या लैगिंक शोषणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. हे सर्वच संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे. तसेच या प्रकरणाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत हे प्रश्न विचारले आहेत. बदलापूरमधील शाळेचे ट्रस्टी कोठे आहेत तसेच वामन म्हात्रे कोठे आहेत, असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. बदलापूरच्या शाळेचे ट्रस्टी कोठे आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे काय असा सवाल त्यांनी केला आहे. शाळेचे ट्रस्टी भाजपशी संबंधित असल्याने त्यांना वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे, याची माहिती सरकार देईल का,तसेच महिला पत्रकाराला उन्मत्त सवाल करणारे मिंधे गटाचे वामन म्हात्रे कोठे आहेत, असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच आता आंदोलन करणाऱ्या बदलापूरकरांवरील गुन्हे मागे घेणार का, असा संतप्त सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात मुख्य प्रश्न असा उपस्थित होतो की, बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? त्यांना भाजप-मिंधे राजवट का संरक्षण देत आहे? 2) मिंधेच्या स्थानिक चॅपचे काय- वामन म्हात्रे यांनी एका पत्रकाराला प्रश्न विचारला की ती या घटनेवर बलात्कार झाल्यासारखे का विचारत आहे. त्याला संरक्षण का दिले जात आहे? 3) आंदोलन करणाऱ्या नागरिकांवरील खटले परत घेणार का? त्यांना गुंडांसारखी वागणूक दिली जात होती. पोलीस कोणाचे संरक्षण करत होते? शाळेच्या विश्वस्तांचा भाजपशी संबंध असल्याचे समजते. आणि त्यांचे संरक्षण केले जात आहे.ते खरे आहे का?सरकार उत्तर देईल का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे केले आहेत.