पालिकेतील लिपिक पदासाठी नोकरभरती; स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे प्रशिक्षण वर्ग

मुंबई महापालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) या पदासाठी नोकरभरती करण्यात येणार आहे. या परीक्षेत जास्तीत जास्त उमेदवार उत्तीर्ण व्हावेत यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदाच्या 1846 जागा भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवन येथे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षण वर्गाचा कालावधी दहा दिवसांचा असून प्रशिक्षण वर्ग संध्याकाळी 5.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत असतील. ज्या उमेदवारांना या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नाव नोंदणीसाठी शिवसेना भवन येथे शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999), सुधाकर नर (8369442951) यांच्याशी सायंकाळी 6 ते रात्री 8.30 या वेळेत रविवार व सुट्टीचे दिवस वगळून संपर्क साधावा, असे संघटन सचिव उमेश नाईक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.