पुणे शहर भाजपमधील अंतर्गत स्पर्धा यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात झालेल्या कार्यक्रमाला गर्दी नव्हती. ही बाब भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे खडबडून जागे होत भाजपने शहरातील व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रेक्षक जमा करण्याचे ‘टार्गेट’ दिले आहे.
कर्वेनगर येथे पालखी महामार्ग आणि इतर विकास विषय कार्यक्रमांमध्ये गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप, महायुती दिग्गजांची फळी व्यासपीठावरती होती. कोथरूड आणि परिसरात कार्यक्रमाची मोठी फ्लेक्सबाजी करण्यात आली होती. परंतु या कार्यक्रमात खरी चर्चा रंगली ती प्रेक्षक नसल्याची अन् जाहिरातबाजी करून नेत्याच्या पुढे न झालेल्या गर्दीची. या कार्यक्रमामध्ये जगन्नाथ महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवेमुळे वारकरी संप्रदायाने गर्दी केल्यामुळे लाज राखता आली.
आपण थोडक्यात बचावलो, अशी प्रतिक्रिया भाजपमधील जबाबदार शहर पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना दिली.
z महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केलेल्या शिवाजी रस्त्यावरील ऐतिहासिक भिडे वाडय़ाचे राष्ट्रीय स्मारक उभारले जात आहे. या कामाचा शुभारंभ यापूर्वीच झालेला आहे. असे असतानाच कामाचे पुन्हा भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.