BMC कॅडरवर अन्याय का? महापालिका उपायुक्तांच्या नियुक्ती संदर्भातील निर्णयावरून आदित्य ठाकरेंचा सवाल

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त पदी राज्य सरकारी कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याच्या निर्णयावरून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी निशाणा साधला आहे. सोशल मीडिया साइट X वरून त्यांनी काही प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे. भाजपच्या कार्यकाळात अशा प्रकारे अधिकारी लादण्याच्या प्रकारावर आदित्य ठाकरेंनी घणाघात केला आहे.

‘महाराष्ट्रात भाजपच्या राजवटीत मुंबई महापालिकेतील उपायुक्तांच्या जागेच्या संदर्भात बदल करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यावर लादण्यात येत आहेत. महानगरपालिका उपायुक्त पदाची जबाबदारी अनेक दशकांपासून मुंबई महापालिकाने स्वत:च्या कॅडरद्वारे नेहमीच अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळली आहे आणि त्याद्वारे लोक सेवा केली आहे. मुंबई महापालिकेच्या कॅडरवर हा अन्याय का? मुंबई महापालिकेच्या केडरवर अविश्वास का दाखवला जात आहे?, असा खणखणीत सवाल आदित्य ठाकरे यांनी X वरून उपस्थित केला आहे. त्यासोबतच उपायुक्तांच्या निवडीसंदर्भातील निर्णय मागे घेतला पाहिजे, असे ठणकावत मुंबई महापालिकेच्या कॅडरमधूनच उपायुक्तांची नियुक्त करा, अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.