व्होडाफोन-आयडियाने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत तीन वर्षांत 4 जी आणि 5 जी नेटवर्क इक्विपमेंट्सच्या पुरवठ्यासाठी तब्बल 3.6 अब्ज डॉलर म्हणजेच 30 हजार कोटी रुपयांची डील केली आहे. प्रमुख बाजारांमध्ये 5 जी लाँच करणे, डेटा ग्रोथच्या माध्यमातून क्षमता वाढवणे आणि 4 जी पॉप्युलेशनचे कव्हरेज 103 कोटींनी वाढवून 120 कोटींपर्यंत नेणे हे कंपनीचे उद्दिष्ट असणार आहे.
आपल्या ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे सीईओ अक्षय मुंदडा यांनी सांगितले. नोकिया आणि एरिक्सन हे दोघे सुरुवातीपासूनच आमचे भागीदार राहिले आहेत आणि त्यांच्यासोबतची पार्टनरशिप आमच्यासाठी मैलाचा दगड ठरल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, शुक्रवारी व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 1.35 टक्क्यांची वाढ दिसली. शिवाय कंपनीचा मार्केट कॅप 73 हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.