
इराणमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. इराणमध्ये एका कोळशाच्या खाणीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. कोळशाच्या खाणी मिथेन वायूच्या गळतीमुळे झालेल्या स्फोटात 51 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. याबाबत इराणच्या सरकारी मीडियाने रविवारी यासंदर्भात माहिती दिली.
At least 51 dead in Iran coal mine blast – https://t.co/3zCLjLYG8z
— Reuters Iran (@ReutersIran) September 22, 2024
इराणमधील कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटाबद्दल सरकारी वृत्तसंस्था ‘आयआरएनए’ ने सांगितले की, हा स्फोट इराणची राजधानी तेहरानपासून 335 किमी दूर तबस या ठिकाणी झाला. शनिवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात जवळपास 51 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी आपत्कालीन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवल्याचे सांगण्यात आले. अपघात घडला त्यावेळेस खाणीत सुमारे 70 लोक काम करत होते.