आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आप नेत्या आतिशी मार्लेना या दिल्लीच्या सर्वात तरुण आणि तिसऱ्या महिला मुख्यमंत्री झाल्या. त्यांच्या आधी सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पार पाडली होती. आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 17 सप्टेंबरला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आतिशी यांची एकमताने मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली होती.