आइसलँडच्या किनाऱ्यावर दिसले दुर्मिळ अस्वल

आइसलँडच्या एका गावातील झोपडी बाहेर दुर्मिळ अस्वल दिसले. हे अस्वल आइसलँडमधील नाही. 8 वर्षांनंतर ते पहिल्यांदा या ठिकाणी दिसले. यावेळी घरात एक वयोवृद्ध महिला एकटी होती. तिला हे अस्वल दिसताच तिला भीती वाटली. तिने तात्काळ आपल्या मुलीला फोन केला. मुलीने पोलिसाना कॉल केला.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अस्वलाला गोळी घालून ठार केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. ही घटना गुरुवारी घडली. हे अस्वल मूळचे आइसलँडचे नसून ते कधी-कधी ग्रीनलँडहून बर्फावरून प्रवास करत आइसलँडच्या किनारी येतात.

गेल्या काही आठवड्यात उत्तरी किनाऱ्यावर अनेक हिमखंड पाहिले गेले आहेत, असे आइसलँड इन्स्टिटय़ूट ऑफ नॅचरल हिस्ट्रीमधील वैज्ञानिक संग्रहाचे संचालक अन्ना स्वेन्सडॉटीर यांनी म्हटले.