विदेश दौऱ्यांसाठी कोटींच्या कोटी उड्डाणे, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. ते 23 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत राहणार आहेत. ते क्वॉड शिखर संमेलनात सहभागी होतील. तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करतील. अमेरिका दौऱ्यात मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे करण्यात आधीच्या सर्व पंतप्रधानांना मागे टाकले आहे. या दौऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला विदेश दौरा भूतानचा केला होता. पीएमओच्या माहितीनुसार, 2014 मध्ये भूताननंतर ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, फिजी, नेपाळचा दौरा केला होता. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर जवळपास 77 कोटी रुपये 91 लाख रुपये खर्च करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2019 या काळात 57 देशांचे एकूण 92 दौरे केले. तर 2019 ते 2024 पर्यंत 28 देशांचे एपूण 43 देशांचे दौरे केले. पंतप्रधान मोदी हे सर्वात जास्त 8 वेळा अमेरिका दौऱ्यावर गेले. विदेश दौरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी 12 हजार कोटी रुपयांच्या किंमतीचे विमान आहे. तर हिंदुस्थानात दौरे करण्यासाठी 12 कोटी रुपयांची आलिशान गाडी आहे.

दौऱ्यावर दौरे…

2018 मध्ये 23 देशात दौरे केले. स्वित्झर्लंड, जॉर्डन, फिलिस्तीन, यूएई, ओमान, स्वीडन, यूके, जर्मनी, चीन, नेपाळ, रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, रवांडा, युगांडा, साऊथ आफ्रिका, नेपाळ, जपान, सिंगापूर, मालदीव, अर्जेटिनाचा दौरा केला. 2019 मध्ये म्हणजेच लोकसभा निवडणुकीआधी श्रीलंका, मालदीव, किर्गिस्तान, जपान, भूतान, फ्रान्स, यूएई, बहरिन, रशिया, अमेरिका, सौदी अरब, थायलंड आणि ब्राझीलचा दौरा केला.

28 देशांचा दौरा

पंतप्रधान मोदी यांनी 2015 मध्ये सर्वात जास्त विदेश दौरे करत 28 देशांना भेटी दिल्या. या दौऱ्यावर 1 अब्ज 33 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यात श्रीलंका, मॉरिशस आणि सेशेल्स देशाचा दौरा केला. यानंतर मोदींनी सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, पॅनडा, चीन, मंगोलिया, साऊथ कोरिया, बांगलादेश, उजबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, दौरा करण्यात आला.