BSNL चे ग्राहक वाढले, जियो आणि व्होडाफोनने रिचार्ज महाग केल्याचे परिणाम

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNLने कमबॅक केला आहे. गेल्या काही महिन्यांत बीएसएनलच्या ग्राहकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली आहे. ट्रायने याबाबत एक आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार जियो, एअरटेल आणि आयडिया व्हाडोफोनच्या ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. तर बीएसएनलच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे. जुलै महिन्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किंमती वाढवल्या होत्या त्यामुळे अनेक ग्राहकांनी या कंपन्यांना राम राम करत बीएसएनएलचा पर्याय स्विकारला.

जुलै महिन्यात जियो, एअरटेल आणि आयडिया व्होडाफोन कंपनीने आपल्या रिचार्जच्या संख्येत 10 ते 27 टक्क्यांनी वाढ केली होती. एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने गेल्या दोन तीन वर्षांत रिचार्जच्या किंमती वाढवल्या.

जुलै महिन्यात बीएसएनएलकडे 29.4 लाख ग्राहक वाढले आहेत. इतर कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलचे रिचार्ज स्वस्त आहेत. आणि गेल्या काही वर्षांत बीएसएनएलचे नेटवर्कही सुधारले आहे. दुसरीकडे बीएसएनएलने 4जी लॉन्च केले असून त्यावरही काम सुरू आहे.