अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळाला आहे. आपच्या नेत्या आतिशी यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली आहे. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी भाजपच्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या शीला दिक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भुषवले होते.
पंजाब राजपूत कुटुंबातूल आलेल्या आतिशी यांनी ऑक्सफोर्डमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आतिशी यांचे वडिल विजय सिंह दिल्ली विद्यापीठीत प्रोफेसर होते.
2013 साली आम आदमी पक्षाची स्थापना झाली. या पक्षाच्या सहसंस्थापकांपैकी एक आतिशी आहेत. त्या वर्षी झालेल्या निवडणुकीसाठी आतिषी यांनी पक्षासाठी जाहीरनामा तयार झाला होता. तसेच पक्षाच्या सुरुवातीच्या वर्षात संघटना बांधणीसाठीही आतिशी यांनी मोलाची कामगिरी बजावली. पक्षाची धोरणं आणि पक्षाची बाजू मांडण्यात आतिशी पुढे होत्या.
केजरीवाल यांच्या विश्वासातल्या माणसांपैकी आतिशी यांचा समावेश होता. आतिशी यांनी जुलै 2015 ते एप्रिल 2018 पर्यंत शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबत काम केलं. 2015 साली खंडवा जल सत्याग्रहात त्यांनी सहभाग नोंदवला. 2020 साली गोव्यात झालेल्या निवडणुकीत त्या पक्षाच्या प्रभारी होत्या. आतिशी यांच्या नेतृत्वात आपला गोव्यात दोन जागांवर विजय मिळवला होता.
2020 च्या विधानसभा निवडणुकीत आतिशी यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली. आतिशी यांनी कालकाजी जागेवर विजय मिळवला आणि 2023 साली शिक्षण मंत्री झाल्या. केजरीवाल जेव्हा तुरुंगात होते तेव्हा स्वातंत्र्य दिली माझ्या जागी आतिशी ध्वजारोहण करतील अशी विनंतरी नायब राज्यपालांकडे केली होती. पण ही जबाबदारी कैलाश गहलोत यांच्याकडे देण्यात आली.