आम आदमी पक्षाच्या नेत्या अतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असून सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. अरविदं केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
माननीय आतिशी जी ने ली मुख्यमंत्री पद की शपथ🔥
अब @AtishiAAP जी दिल्ली में केजरीवाल जी की काम की राजनीति को बढ़ाएंगी आगे💯 pic.twitter.com/IfN57i0nos
— AAP (@AamAadmiParty) September 21, 2024
आतिशी यांच्यासोबत पाच आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सुल्तानपूरहून पहिल्यांदाच आमदार झालेले मुकेश अहलावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच गोपाल राय, इम्रान हुसेन, कैलाश गहलोत आणि सौरभ भारद्वाज यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.