नूतनीकरणाच्या नावाखाली गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले गिरगावातील स. का. पाटील उद्यान जनतेसाठी लवकरात लवकर खुले करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने सी वॉर्ड सहाय्यक आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर , शिवसेनेचे विभागप्रमुख संतोष शिंदे, विभागसंघटक युगंधरा साळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 तर्फे सी वॉर्ड सहाय्यक आयुक्त किधाते यांना जाब विचारण्यासाठी नुकतीच दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या सी वॉर्ड कार्यालयाला धडक दिली. स. का. पाटील उद्यान जनतेसाठी खुले करून त्या ठिकाणी असलेली खुली व्यायाम शाळा त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्याकरता खेळणी, जॉगिंग ट्रॅक अशा विविध समस्या बैठकीत मांडण्यात आल्या. त्याचबरोबर मुंबादेवी मंदिराजवळ असलेले डम्पिंग ग्राउंडच्या साफसफाईला सुरुवात झाली असून ती नवरात्रीच्या अगोदर पूर्ण साफ करावी. तसेच त्या ठिकाणी नवरात्रीमध्ये येणाऱ्या भाविकांकरिता सोय करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे निवास मयेकर, संपत ठाकूर, कृष्णा पोवळे, उदय बने, दिलीप सावंत, शिवाजी राणे, सुनील कदम, शाखाप्रमुख मंगेश सावंत, संतोष घरत, जयवंत नाईक, महिंद्र कांबळे , वैभव मयेकर, प्रभाकर पाष्टे, अजय शेडगे, शशिकांत पवार, बाळा अहिरेकर, प्रकाश मिसाळ, विजय पवार, कुमटेकर, विशाखा पेडणेकर, माधुरी पेंढारी, कल्पना सुर्वे , कल्पना भांबुरे, ज्योती मेनकुदळे, सुरेखा उबाळे, मीना आंधळे, वर्षा साबळे, रेणुका तेवरकर, रंजना ऐकवडे, संजीवनी मानकर व शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.