परळ येथील स्वामी अर्थात सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन ऍण्ड एन्वायर्नमेंट या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पितृपक्षात दररोज 50 कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धान्यवाटप करण्यात येणार आहे.
पितृपक्षात ज्यांना पितरांचे श्राद्ध घालणे जमत नाही ते पितरांच्या नावाने स्वामी या संस्थेला धान्य किंवा देणगीच्या स्वरूपात मदत करतात. त्या देणगीतून अन्नदान केले जाते. स्वामी संस्थेच्या वतीने पितृपक्षात दररोज संध्याकाळी सहा वाजता परळ पोस्ट गल्ली येथील मदिरा मंजिल 15 क्रमांक येथील संस्थेच्या कार्यालयात कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना धान्यवाटप करण्यात येणार आहे. देणगी देण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी 9869451153, 9820416305 किंवा 9892456359 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.