अमेरिकेत व्याज दरात कपात आणि बाजारातील शानदार भरभराटीनंतर हिंदुस्थानी शेअर बाजारात जबरदस्त क्रेझ पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज 1395 अंकांच्या वाढीसोबत 84,544 अंकांचा नवा उच्चांक गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीसुद्धा 375 अंकांनी वधारून 25,790 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने 84,694 अंकावर आणि निफ्टीने 25,849 अंकांवर पोहोचून आज पुन्हा एकदा आपल्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. शुक्रवारी सेन्सेक्सचे 30 पैकी 26 कंपन्यांचे शेअर्स फायद्यात तर 4 कंपन्यांचे शेअर्स तोट्यात बंद झाले. निफ्टीचे 50 पैकी 44 शेअर्स फायद्यात तर 6 कंपन्यांचे शेअर्स तोट्यात बंद झाले. सेन्सेक्सच्या 30 कंपन्यांपैकी महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वात जास्त 5.37 टक्क्यांनी वाढले. आयसीआयसीआय बँकेचे शेअर 4.47 टक्के, जेएसडब्ल्यू स्टीलचे 3.85 टक्के, लार्सन अँड टबो 2.95 टक्के, भारती एअरटेल 2.65 टक्के, नेस्ले इंडिया 2.51 टक्के शेअर्स वधारले.
तासाभरात 4 लाख कोटी कमावले
शेअर बाजाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले. शुक्रवारी दिवसभरात गुंतवणूकदारांना एकूण 4 लाख कोटी रुपयांचा फायदा झाला. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत थेट 4 लाख कोटी रुपयांची भर पडली. या वाढीसोबत सर्व कंपन्यांचा मिडकॅप 469.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचला.
राडोची दोन नवीन घड्याळे लाँच
स्वीस घड्याळे बनवणाऱ्या प्रसिद्ध राडो कंपनीने राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटन आणि राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट सुपर ज्युबिल ही दोन अफलातून घड्याळे बाजारात आणली आहेत. ही दोन्ही घड्याळे राडोची खास डिझाईन परंपरा, कल्पक मटेरियल्स यांचा सुरेख संगम आहे. अभिनेता हृतिक रोशनने राडो कॅप्टन कूक हाय-टेक सिरॅमिक स्केलेटनचे अनावरण केले. राडो सेंट्रिक्स ओपन हार्ट जुबिल केवळ लक्झरी, शालीनता आणि स्टाइलचे प्रतीक नाही, तर ती एक कलाकृती आहे.
लावाचा नवा 5 जी फोन लाँच
लावा कंपनीने आपला नवा 5 जी फोन लावा ब्लेज 3 हिंदुस्थानात लाँच केला. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा डय़ुअल रियर कॅमेरा, 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी, 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. 6 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज फोनची किंमत 11,499 रुपये आहे. या फोन दोन कलरमध्ये आणले आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉकचे फीचर दिले. फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी डिस्प्ले दिला. 90 एचझेडचे रिफ्रेश रेट्स दिले आहे. या फोनची विक्री 18 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
यामाहाचे नवे व्हर्जन 4.0 लाँच
यामाहा इंडिया मोटरने आपल्या युवा ग्राहकांसाठी ब्रँड कॅम्पेन ‘द कॉल ऑफ द ब्लू’चे व्हर्जन 4.0 लाँच केले. या कॅम्पेनची नवी घोषणा ‘हीयर द कॉल नाउ’ आहे. जी आधीची घोषणा ‘हॅव यू हर्ड द कॉल?’चा विस्तार आहे. तरुण मोटरसायकल रायडर्संना आकर्षित करणे हा याचा उद्देश आहे. या वेळी यामाहा मोटर इंडिया ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष ऐशिन चिहाना उपस्थित होते.
इजमायट्रिपचे मेडिकल टूरिझममध्ये पाऊल
ऑनलाईन ट्रव्हल सर्व्हिस पुरवणारी कंपनी इजमायट्रिपने आता मेडिकल टूरिझम इंडिस्ट्रीजमध्ये पाऊल ठेवले आहे. ईजीट्रिप प्लानर्सने रॉलिन्स इंटरनॅशनलमध्ये 30 टक्के भागीदारी आणि फ्लेज होम हेल्थकेअर सेंटरमध्ये 49 टक्के भागीदारी खरेदी केली आहे. यासाठी कंपनीने 90 कोटी रुपये मोजले आहेत. रॉलिन्ससाठी 60 कोटी तर फ्लेजसाठी 30 कोटी रुपये मोजले आहेत.
सीएट नागपूरने साधला विक्रमी टप्पा
सीएट टायर उत्पादक कंपनीने विक्रमी टप्पा गाठल्याचे जाहीर केले. कंपनीच्या नागपूर येथील प्लँटमधले 10 दशलक्षाव्या टायरचे उत्पादन करण्यात आले. या प्लँटद्वारे विविध बाजारपेठांना निर्यात केली जाते. यात आफ्रिका, अमेरिका, युरोप, बांगलादेश, फिलिपाइन्स, नेपाळ, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.
डेटा बेंचमार्किंग संस्था
भारतीय रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (आरईआयटी) ने गुंतवणूकदारांना सक्षम करण्यासाठी डेटा बेंचमार्किंग संस्था (डीबीआय) सुरू करण्याची घोषणा केली. यावेळी आरईआयटीचे डब्ल्यूटीएम अश्वनी भाटिया उपस्थित होते.
टीएसएफचा विस्तार
टीएसएफ ग्रुपने आयएए24 मध्ये जागतिक बाजारपेठेसाठी आपली ब्रेक्स, ऍक्सल्स आणि व्हील्स यासह विविध विस्तृत उत्पादने सादर केली. या वेळी व्हील्स इंडियाचे एमडी श्रीवत्स रामब्रेक्स आणि ब्रेक्स इंडियाचे एमडी श्रीराम विजी उपस्थित होते.
सेल्सफोर्सची सुविधा
सेल्सफोर्सने नवीन एआय तंत्रज्ञान साधन ‘एजंटफोर्स’ सादर केले. हे स्वायत्त एआय साधन कर्मचाऱ्यांना अनेक कामांमध्ये मदत करणार आहे. या वेळी सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ उपस्थित होते. एजंटफोर्स हे एआय क्षेत्रातील तिसरी लाट आहे, असेही ते म्हणाले.
स्टील ब्रँडची घोषणा
आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया (एएम/एनएस इंडिया) या आर्सेलरमित्तल आणि निप्पॉन स्टील या जगातल्या दोन आघाडीच्या स्टील उत्पादक कंपन्यांनी मॅग्नेलिस या जागतिक मान्यताप्राप्त स्टील ब्रँडची घोषणा केली. यावेळी दिलीप उमेन उपस्थित होते.