न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान शिष्टाचार पाळा, आपण काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे ठरवू शकतो, अशा शब्दांत बंगळुरूतील गोरीपाल्या या मुस्लिमबहुल परिसराला पाकिस्तान संबोधणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. श्रीशानंद यांना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सुनावले. तसेच याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या महासचिवांनी दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले. बंगळुरू उच्च न्यायालयात 28 ऑगस्ट रोजी विम्याशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी घेत असताना न्यायाधीश श्रीशानंद यांनी टीप्पणी केली होती.