टी-20 वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेचा महिला संघ जाहीर

पुढच्या महिन्यात होणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी श्रीलंका महिला संघ जाहीर केला आहे. या संघाच्या नेतृत्वाची धुरा अष्टपैलू खेळाडू चामरी अटापट्टू हिच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेला 3 ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने सुरुवात होत आहे.

अवघ्या काही दिवसांवर विश्वचषक येऊन ठेपल्याने सर्व देश तयारीला लागले असून अंतिम संघ जाहीर करण्यात येत आहेत. गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, हिंदुस्थान, न्यूझीलंड आणि पाकिस्तानसह श्रीलंकेचा या विश्वचषक स्पर्धेमध्ये ‘अ’ गटात समावेश आहे. श्रीलंकन संघ 3 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने विश्वचषक स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करतील.

श्रीलंका संघ ः चामरी अटापटू (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षी डि’सिल्व्हा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहारी, सचिनी निसानसाला, विशामी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूर्या, सुगंनी कुमारी, सुगंधी कुमारी, सुगंधी, शहीद कुमारी, गौतम अमा कांचना.