मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की आणि कुणी यांना फक्त महाराष्ट्र ओरबाडून खायचा आहे. सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता… टेंडरवाले आणि दोन नंबरचे बोगस धंदे करणाऱ्यांचे संरक्षण करणाऱ्यांचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. मिंधे गटात निवडणुकीच्या तिकिटासाठी 20 कोटी मागतात, असा जोरदार हल्ला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मिंधे सरकारवर आज चढवला. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव नाही हे संविधानाला अपेक्षित नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
ओबीसी संपविण्याचे सरकारचे धोरण
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा हे या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे, म्हणून आम्हाला उपोषणाला बसाव लागतंय. ओबीसी हे शब्द एकनाथ शिंदे यांच्या तोंडून कधी येत नाही याची आम्हाला लाज वाटते. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या दायीत्वाची शपथ घेतली आहे आणि तुम्ही हैद्राबाद गॅझेट लावायला निघालात. काय आहे त्या गॅझेटमध्ये या प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत, असे हाके म्हणाले.
मिंधे उमेदवारीसाठी 20-20 कोटी मागतात
यांना फक्त गर्दी करून मेळाव्याला जायला, झेंडे आणि गर्दी जमवायला लोक हवेत. पण निवडणुका आल्यावर आमदार-खासदारकी द्यायची वेळ आली की तुमच्याकडे पैसे आहेत का?, असे विचारतात. उमेदवारीसाठी 20-20 कोटी रुपये मागितले जातात. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार होते का?, अशा शब्दात मिंधे गटाच्या नेत्यांचा लक्ष्मण हाके यांनी समाचार घेतला.
ओबीसी संपविण्याचे सरकारचे धोरण
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा हे या मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे, म्हणून आम्हाला उपोषणाला बसावं लागतंय. ओबीसी हे शब्द एकनाथ शिंदे यांच्या तोंडून कधी येत नाही याची आम्हाला लाज वाटते. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या दायित्वाची शपथ घेतली आहे आणि तुम्ही हैदराबाद गॅझेट लावायला निघालात. काय आहे त्या गॅझेटमध्ये या प्रश्नांची उत्तरे आम्हाला हवी आहेत, असे हाके म्हणाले.