मुंबई विद्यापीठाच्या 22 सप्टेंबर 2024 रोजी नियोजित निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यापीठाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रक काढून शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत पदवीधर सिनेट निवडणूक तात्पुरती स्थगित केल्याचे घोषित केले.
पदवीधरांच्या संघाच्या निवडणुकीची अधिसूचना दिनांक 3 ऑगस्ट, 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर अधिसूचनेप्रमाणे नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाची निवडणूक 22 सप्टेंबर 2024 रोजी पार पडणार होती. मात्र शुक्रवारी विद्यापीठाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे पत्रकाद्वारे घोषित केले.