काश्मीरमधील बडगाममध्ये बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. या बसमध्ये 35 जवान होते. दुर्घटनेत बसमधील तीन जवांनाचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले आहेत. मध्य काश्मीरमधील ब्रेल वॉटरहेल भागात हा अपघात झाला.
सर्व जखमी जवानांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी सहा जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जवान आपल्या कर्तव्यावर जात असतानाच ही घटना घडली.