एकनाथ शिंदे हे दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचे मुख्यमंत्री आहेत असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला आहे. तसेच मिंधे गटात तिकिटासाठी 20 कोटी रुपये मागतात असा गंभीर आरोपही हाके यांनी केला.
टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. हाके म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना फक्त झेंडे लावायला, दसरा मेळाव्यात गर्दी करायला शिवसेना हवी आहे, पण जेव्हा आमदारकी आणि खासदारकी द्यायची वेळ येते तेव्हा तिकिट मागणाऱ्यांनाच 20 कोटी रुपये मागितले जातात. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे हे विचार होते का ? महाराष्ट्र ओरबाडून खाण्यासाठी एक टोळी निर्माण झाली आहे. सत्तेमधून पैसा आणि पैश्यांमधून सत्ता हे समीकरण सुरू आहे. यात ओबीसी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटलेले नाही. कंत्राटदार आणि दोन नंबरचा धंदा करणाऱ्यांचे शिंदे मुख्यमंत्री आहेत. यांना सामाजिक न्यायाची व्याख्यासुद्धा माहित नाही. महाराष्ट्र म्हटलं की समोर येतं की मराठा तितुका मेळवावा. पण मराठा तेवढाच मेळवावा आणि दलित, ओबीसी, भटका संपवावा हे धोरण शिंदे यांचे आहे. एकनाथ शिंदे ओबीसींसाठी एक शब्द बोलत नाही तुमची आम्हाला लाज वाटते असेही हाके म्हणाले.