गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान फटाके फोडताना नागपुरात दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. फटाके फोडत असताना काही फटाके अंगावर उडाल्याने 11 महिला भाजल्याची घटना नागपुरातील उमरेड शहरात घडली.
गुरुवारी रात्री उमरेश शहरात गणपती विसर्जन मिरवणूक सुरु होती. यावेळी तेथील एका निर्माणाधीन इमारतीवर फटाक्यांची आतषबाजी सुरु होती. यावेळी फटाके फोडल्यानंतर काही फटाके वर न जाता खालच्या दिशेला उडाले. रस्त्याच्या शेजारी मिरवणूक पाहण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर हे फटाके पडले. यात 11 महिला भाजल्या.
सात महिलांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर चार महिलांना उमरेडमधील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व महिलांची प्रकृती स्थिर आहे.