iPhone 16 साठी तहानभूक विसरून रांगेत उभा राहिला, ऑनलाइन मागवताच मिनिटांत मिळाला!

जगभरात 9 सप्टेंबर रोजी लॉन्च झालेली iPhone 16 ची सीरिज शुक्रवार पासून हिंदुस्थानात विक्रीसाठी उपलब्ध झाली. याचा सुगावा लागताच फोन खरेदी करण्यासाठी मुंबईतील बीकेसी भागातील अ‍ॅपल स्टोअरबाहेर भली मोठी रांग लागलेली पाहायला मिळाली. स्टोअर बाहेरचे फोटो आणि व्हिडीओ सकाळपासून सोशल मीडियावर पाहायला मिळाले.

या सीरिजमधील फोन ऑफलाइन स्टोअरसोबतच ऑनलाइन देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. सकाळपासून अ‍ॅपल स्टोअरबाहेर लांब रांगा लागलेल्या. मुंबईसारखीच परिस्थिती दिल्लीतही पाहावयास मिळाली. तसेच देशातील शहरांमध्ये देखील फोन घेणाऱ्यांची गर्दी पाहावयास मिळाली. अशातच एका अ‍ॅपल चाहत्याला iPhone 16 सीरिज मधील फोन मिळवण्याचा आणखी मार्ग सापडला. एका व्यक्तीने ट्विटरवर ट्विट करत याबाबत माहिती दिली.

Image

iPhone 16 खरेदी करण्याकरीता एक मुलगा शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास दुकानात जाण्याकरीता रांगेत उभा होता. त्याची वेळ येईपर्यंत तो वाट बघत होता. पण रांग भलतीच मोठी होती. वाट पाहणारे देखील कंटाळले होते. याचवेळी एक मजेदार घटना घडली.

सकाळपासून रांगेत उभे असलेल्या एका ग्राहकाने फ्लिपकार्ट मिनिट्सवर iPhone 16 ची ऑर्डर दिली, आणि काही मिनिटांतचं त्याला iPhone ची डिलीव्हरी देखील मिळाली. @swapnilsinha07 या X वापरकर्त्याने याबाबत फोटो शेअर करत माहिती दिली. @swapnilsinha07 च्या पुढे एक तरूण रांगेत उभा होता. या तरूणाने रांगेत बराच वेळ उभे राहून वाट पाहिली. शेवटी कंटाळून रांगेत उभा असतानाच ऑनलाइन फोनची ऑर्डर दिली.

iPhone सीरीज अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा आणि इतर अॅप्सवर देखील ऑर्डर करू शकता येते. पण त्याच्या डिलेव्हरीसाठी किमान 2 ते 3 दिवसांचा कालावधी जातो. पण अगदी काही मिनिटांत iPhone सीरीज हवी असल्यास तुम्ही BlinkIt, BigBasket आणि Zepto सारख्या अॅप्सवर प्रयत्न करू शकता.