>> आकाश दीपक महालपुरे
पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितिज निर्माण करणारे विजयी साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात आणि विजयाच्या वाटेवर घेऊन जातात. मात्र वाचनाची सवय ही माणसाला एकदा लागली की, माणूस हा मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्रियकराप्रमाणे पुस्तकांच्या सहवासात आपोआप गुंतून जातो. पुस्तकांमुळे ढासळलेल्या मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गत्रेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून वंचित राहतो. आजकालच्या तरुणांना रिकाम्या व्यसनांच्या आहारी जाऊन फुकटचा ताण खूप असतो. त्यामुळे त्या मुलांना व्यसनापासून सर्वत्र दूर राहण्यासाठी वाचनच मदत करू शकते. वाचन संस्पृती जपण्याशिवाय मानव जातीला बिलपूल पर्याय नाही. वाचनामुळेच माणूस हा प्रगल्भ असतो. नियमित वाचन केले तरच येणारी भावी पिढी सक्षम व सुजाण होईल. आजच्या तरुण पिढीने रिकामे छंद जोपासण्यापेक्षा पुस्तक वाचन हा फुकटचा छंद शंभर टक्के जोपासला पाहिजे. तसे पाहिले तर साक्षर तरुणांपैकी 61 टक्के जण त्यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत पुरेपूर समाधानी आहेत. मात्र वाचनाचा छंद असलेल्या तरुणांमध्ये समाधानाचे प्रमाण 70 टक्के, तर कमी वाचन करणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण 58 टक्क्यांपर्यंत आहे. वाचन समृद्ध असले म्हणजे कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यास आपोआपच खतपाणी मिळते. इतरांबाबत, नातेवाईकांबाबत, समाजाबाबत आपली काही कर्तव्ये आहेत याचे भानही प्राप्त होते. मन संपुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भानसुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. सध्याचा सण-उत्सवाचा हंगाम आपण 100 टक्के ‘वाचूया आनंदे’ म्हणून साजरा करुया. वाचन संस्पृतीची नव्याने जनजागृती करूया.