Mumbai Fire – अंधेरी लोखंडवाला परिसरात भीषण आग, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

मुंबईतील अंधेरी परिसरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स मध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग रो हाऊसला लागली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फायर ब्रिगेड, पोलीस आणि पालिकेचे अधिकारी लगेच घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक रो हाऊस दिसत असून त्यातून धूर आणि आगीचे लोट दिसत आहेत.

बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरातील स्टेलर बंगल्याच्या क्रॉस रोड नंबर 2 वरील बंगला नंबर 11 मध्ये आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती गुरुवार सकाळी 8 वाजून 57 मिनीटांवर मिळाली. सकाळी 9.22 वाजता या आगीला लेव्हल-1 ची आग घोषित केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. बीएमसीने सांगितले की, आग सुरुवातीला बंगल्याच्या आत लागली आणि काही वेळातच ती पहिल्या मजल्यावर पसरली. मुंबई फायर ब्रिगेड, रूग्णवाहिका, अदानी पावरचा स्टाफ आणि बीएमसी अधिकारी घटनास्थळी पोहोचले, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.