श्रावण संपताच नॉनव्हेजवर तुटून पडताय? मग लक्षात घ्या या महत्त्वाच्या गोष्टी…

श्रावण महिना संपला आहे. हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत महत्त दिले जाते. हा महिना व्रत-कैवल्याचा मानला जातो. अनेक लोक या महिन्यात मांसाहार करणे टाळतात. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत.

जाणून घ्या श्रावणामध्ये मांसाहार टाळण्याचे शास्त्रीय कारण

काही लोक श्रावण महिन्यात मांसाहार पदार्थ जसे की चिकन, मासे, अंडी खाणे टाळतात. बहुतेक लोक हे धार्मिक कारणांसाठी करतात. पण याचे शास्त्रीय कारण म्हणजे मुसळधार पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढते. त्यानंतर बुरशीचा धोका वाढतो. तसेच या दमट वातावरणात पचनशक्तीही कमजोर होते. मांसाहारी पदार्थ पचायला वेळ लागतो. म्हणून पावसाळ्यात मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. तरीही श्रावण संपल्यावर ज्यांना मांस खाण्याची इच्छा होते त्यांनी काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्याव्या, जेणेकरून तुमच्या आरोग्यास हानी होणार नाही.

दीर्घ काळानंतर नॉनव्हेज खाण्याआधी लक्षात घ्या या महत्त्वाच्या गोष्टी…

1. मांसाहार करू शकता. पण दीर्घ विश्रांतीनंतर मांस पचवण्याची क्षमता कमी होते. पहिल्यांदा मांस खाल्यावर थोडे जड वाटू शकते. त्यामुळे थोड्या प्रमाणात खावे.
2. दीर्घ काळानंतर मांस खाणार असाल तर हलक्या गोष्टींपासून सुरुवात करावी. जसे की अंडी, मांस, चिकन यानंतर तुम्ही जड मांसाहारी पदार्थ खावू शकता.
3. कमी प्रमाणात मांसाहार करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून पोटदुखी, आम्लपित्त, आणि पोट फुगण्याची समस्या होणार नाही.
4. मांसाहार सुरू करताना मसाल्यांची काळजी घ्यायला हवी. जास्त मिरची किंवा मसाले वापरल्याने पोट बिघडण्याचा धोका असतो.