बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या सुरक्षा ताफ्यात शिरण्याचा एकाने प्रयत्न केल्याची घटना घडली. सलमानच्या गाडी पर्यंत पोहचण्यापूर्वीच त्याला स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) ने ताब्यात घेतले. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एका जणा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
मे महिन्यात अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर सलमानच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली होती. मंगळवारी सकाळी सलमान हा त्याच्या ताफ्यासह वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे येत होता. तेवढ्यात एक मोटारसायकलस्वार हा सलमानच्या एस्कॉर्ट ( सुरक्षा ताफ्यात) येण्याचा प्रयत्न करू लागला. सुरुवातीला एसपीजीच्या अधिकाऱ्याने त्या मोटारसायकल स्वाराला चालकाला हटकले. त्यानंतर दुसऱ्यांदा देखील तो गाडीजवळ येण्याचा प्रयत्न करत होता.