Venus Orbit Mission – चंद्र आणि मंगळनंतर इस्रोचं आता मिशन शुक्र

चंद्र आणि मंगळनंतर आता भारतीय वैज्ञानिकांनी आता शुक्राकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे. केंद्र सरकारनेही व्हीनस ऑर्बिटर मिशन(VOM)ला परवानगी दिली आहे. या मिशनसाठी सुमारे 1200 कोटी रुपयांहून अधिक खर्च येणार आहे. मंगळयानाप्रमाणेच या मोहिमेतही व्हीनस ऑर्बिटर शुक्रावर पाठण्यात येणार आहे.

व्हीनस ऑर्बिटर मिशन मोहिमेत शुक्राचा पृष्ठभाग आणि वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अंतराळाशी संबंधित अनेक प्रस्तावांना मंजुरी दिली. यामध्ये व्हीनस ऑर्बिटर मिशनचा समावेश आहे.

व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) या भारताच्या शुक्रावरील पहिल्या मोहिमेसाठी 1,236 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यापैकी 824.00 कोटी रुपये केवळ अंतराळयानावर खर्च केले जातील. हे मार्च 2028 मध्ये लॉन्च होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

वैज्ञानिक संशोधन करणे, भूगर्भशास्त्र समजून घेणे तसेच शुक्रावरील वातावरणाचे संशोधन करून वैज्ञानिक डेटा गोळा करणे हा व्हीनस ऑर्बिटर मिशन (VOM) चा उद्देश आहे.