सौरव गांगुली संतापला, अपमान करणाऱ्या युट्युबरविरोधात पोलिसात केली तक्रार

टिम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली प्रचंड संतापला आहे. सौरव गांगुली याने आपल्याबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या युट्युबरला चांगलाच धडा शिकवला आहे. त्या युट्युबर विरोधात थेट कोलकाता सायबर सेलकडे  तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

सौरव गांगुली याची सेक्रेटरी तानिया भट्टाचार्यने ही तक्रार दाखल केली आहे. तिने या युट्युबरचे नाव आणि त्याने बनवलेला व्हिडीओचा उल्लेखही तक्रारीत केला आहे. तानियाने सायबरबुलिंग आणि मानहानीची तक्रार करत सायबर सेल पोलिसांकडून युट्युबरविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने तक्रारीत म्हंटले आहे की, युट्युबरने त्याच्या व्हिडीओत सौरव गांगुली याच्यावर निशाणा साधला आहे. त्याच्याविरोधात आक्षेपार्ह बोलला आहे.

सौरव गांगुलीने हिंदुस्थानच्या संघासाठी 113 टेस्ट मध्ये 7212 धावा आणि 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 हजार 363 धावा केल्या आहेत. त्याने 59 व्या आयपीएल 20 डावात 363 धावा केल्या.