
गोंदिया आता बिहार बनू लागला आहे. कारण गोंदिया जिल्ह्यात देखील आरोपी वाढदिवसाला तलवारीने केक कापत हवेत गोळीबार करत आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचा धाकच उरला नाही अशी चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्याच्या घिवारी येथील जितेन्द्र येडे याचा वाढदिवस असल्याने त्यांनी तलवारीने केक कापला तर त्याच्या दोन मित्रांनी बंदूक हवेत उडवत फायरींग केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला. त्यामुळे गोंदिया पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुद्ध समाजात शांतता प्रस्थापित होत असल्याने पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केली आहे