नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाथर्डी फाट्यावरील गौळने गावात पत्नी आणि मुलीसह पतीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. विजय सहाने, ज्ञानेश्वरी सहाने आणि अनन्या सहाने अशी मयतांची नावे आहेत.
कंपनीतील त्रासाला कंटाळून विजयने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. नाशिकमधील बॉश कंपनीत विजय गेल्या 12 वर्षांपासून काम करत होते. कंपनीच्या जाचक नियमांमुळे विजय हे अनेक दिवसांपासून अस्वस्थ होते. याच कारणातून त्यांनी कुटुंबासह आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
घटना उघड होताच नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. इंदिरानगर पोलिसांनी आत्महत्येबाबत गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे. तपासाअंती सत्य समोर येईल.