टीम इंडियाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि माजी कर्णधार विराट कोहली यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते हिंदुस्थानी क्रिकेटपटू रोहित शर्मा याची टिंगल करताना दिसत आहेत. खरंतर रोहित शर्मा त्याच्या विसरभोळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. विराट कोहलीसह रोहितच्या सहकाऱ्यांनाही त्याच्या या स्वभावाची प्रचिती आहे. यावरून विराट कोहली अनेकदा त्याची टिंगल उडवली आहे. आता असाच काहीसा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नुकताच बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये बांगलादेशच्या पहिल्या कसोटीपूर्वी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये एक चॅट झाले. त्यामध्ये गौतम गंभीर विराटला विचारतोय, पुढचा गेस्ट रोहित आहे. तुला काय वाटतं मी कोणता प्रश्न त्याला विचारू? माझा पहिला प्रश्न काय असायला हवा?
When an unstoppable force meets an immovable object—cricket’s greatest paradox, personified! 👌 👌
Presenting an iconic interaction between #TeamIndia Head Coach @GautamGambhir & the legendary @imVkohli 👏 👏 – By @RajalArora & @Moulinparikh#INDvBAN | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 18, 2024
विराट गमतीने त्याला सांगतो, मला वाटतं रोहितसाठी खूप सोपा प्रश्न आहे. सकाळी भिजलेले बदाम खातोस की नाही? आणि दोघं हसायला लागतात. पुढे गंभीर म्हणतो, त्याने रोहितला मदत होईल, जेणेकरून त्याला रात्री नाही तर, सकाळी 11 वाजता यायचे आहे लक्षात राहिल. “तर, रोहित, तुझ्यासाठी हा पहिला प्रश्न आहे,” विराट म्हणाला.
हिंदुस्थान आणि बांगलादेशदरम्यान दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना उद्यापासून म्हणजे गुरुवार 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये पराभूत करून T20 विश्वचषक जिंकला.