‘या’ प्रसिद्ध पंजाबी गायकाला जीवे मारण्याची धमकी, मागितली 1 कोटीची खंडणी

प्रसिद्ध पंजाबी गायक आर. नैत याला धमकीचा फोन आला आहे. गायकाच्या व्यवस्थापकाने याबाबत पोलिसांत तक्रार केली आहे.सायबर टीम नेमके कोणत्या फोन नंबरवरून धमक्या येत आहेत याची चौकशी करत आहे.

तेरे यार नूं दबण नूं फिरदे सी.. आणि तेरा यार डिफॉल्टर तन होया… सारखी गाणी गाऊन नैत खूप प्रसिद्ध झाला. आता या गाण्याच्या काही ओळींबाबत त्याला धमकी देण्यात आली असून त्याच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. याबाबत आर. नैतच्या व्यवस्थापकाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सायबर टीम कोणत्या फोन नंबरवरून धमक्या येत आहेत याची चौकशी करत आहे.

गायकाला दिलेल्या धमकीमध्ये आरोपीने आर नैतचे “तेरे यार नूं दबण नूं फिरदे सी” हे गाणे गायले आणि त्याला धमकी दिली. आरोपीने “असी दबना जानादे या” असे म्हटले. आर नैत यांना परदेशी क्रमांकावरून धमकावले जात असून सध्या ते परदेशात आहेत. या प्रकरणात कोणाचे नाव समोर आले नसले तरी संशयाची सुई लॉरेन्स आणि रिंदा टोळीकडेच आहे.